Best Fashion and Interior Design Institute in Borivali (west), “Envisage Institute of Design”

                         आनंदीबाई गोपाळराव जोशी
                                                    (भारतातील पहिली महिला डॉक्टर)



जीवन :   आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१मार्च १८६५ रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला. आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते, जुन्या कल्याण परिसरातील पारनाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या जेष्ठ कन्या होत्या. वयाच्या नवव्या वर्षी  त्यांचा विवाह वयाने २० वर्षांनीं मोठे असणाऱ्या गोपालराव जोशी यांच्याशी झाला. गोपाळराव जोशी हे मुळचे संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी होते लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्नीचे नाव आनंदीबाई असे ठेवले. लग्नापूर्वी त्यांचे नाव यमुना असे होते वयाच्या चौदाव्यावर्षी अनंदीबाईंनी एक मुलाला जन्म दिला परन्तु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मूल फ़क्त १० दिवस जगले. आनंदीबाईंच्या  जीवनात हा  एक महत्वाचा टप्पा ठरला आणि त्यांना  डॉक्टर बनण्याची प्रेरणा मिळाली. गोपाळरावांनी त्यांना मिशनरी शाळांमधे प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केला, कलकत्त्याला गेल्यावर तिने संस्कृत आणि इंग्रजी वाचणे आणि बोलणे शिकले.
           गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसात कारकुन होते नंतर त्यांची अलीबाग येथे आणि नंतर कोलकाता येथे बदली झाली. ते एक पुरोगामी विचारवंत होते, आणि त्या काळातही त्यांचा महिला शिक्षणाला पाठिंबा होता.  आपल्या पत्नीने वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनावे असा त्यांचा आग्रह होता ते स्वतः लोकहितवादींची शतपत्रे वाचत आपल्या पत्नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी जाणले लोकहितवादींच्या शतपत्रांमुळे ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्नीस इंग्रजी शिकवण्याचा त्यांनी निश्चय केला.

वैद्यकीय शिक्षण:   आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळरावांनी अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती, आणि धर्मांतर करणे तर त्यांना मान्य नव्हते. मात्र त्यानी प्रयत्न सोडले नाही.  पुढे आनंदीबाईंची तळमळ आणि गोपाळरावांची चिकाटी  यांचे फलित म्हणजे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता १८८३ मध्ये  वयाच्या १९ व्या वर्षी ”विमेंस मेडिकल कॉलेज ऑफ़ पेन्सिल्विनिया" मध्ये प्रवेश मिळाला.  येथे गेल्यानंतर अमेरिकेतील नविन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृति ढासळली होती. परंतु अमेरिकेतील कारपेंटर जोडप्याचे साहाय्य त्यांना लाभले
सुरुवातीला तात्कालीन भारतीय समाजाकडून आनंदीबाईंच्या डॉक्टर होण्याला खुप विरोध झाला. त्यावेळी आनंदीबाईंनी कोलकाता येथे एक भाषण केले. तेव्हा त्यांनी भारतामधे महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले, आणि हे स्पष्ट सांगितले की मला यासाठी धर्मांतर वगैरे करण्याची काही गरज नाहीये. मी माझा हिंदू धर्म व संस्कृती यांचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरु करायचे आहे.
             आनंदीबाईंनी केलेले हे भाषण लोकांना खुप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून सबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तात्कालीन वॉइसरॉय यांनी पण २०० रुपयांचा फंड जाहिर केला. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पूर्ण करुन मार्च १८८६ मधे आनंदीबाईंना एम्.डी. ची पदवी मिळाली. एम्. डी. साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्यांचा विषय होता, ‘हिंदु आर्य' लोकांमधील ‘प्रसूतिशास्त्र'. एम्. डी. झाल्यावर विक्टोरिया राणीकडून सुद्धा त्यांचे अभिनंदन झाले. त्यांच्या पदविदान समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित राहिले; ‘भारतातील पहिली स्री डॉक्टर' म्हणून सर्व उपस्थितानी उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून आनंदीबाईंची प्रशंसा केली ,
              एम्. डी. झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात आल्या तेव्हा त्यांचे स्वागत व अभिनंदन झाले. त्यांना कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्री कक्षाचा ताबा देण्यात आला.

 मृत्यु:    वयाच्या विशितच त्यांना क्षयरोग झाला होता. पुढे काही महिन्यांतच म्हणजे २६ फेब्रुवारी इ. स. १८८७ रोजी त्यांचा पुण्यात मृत्यु झाला. केवळ २१ वर्षांच्या जीवनयात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. दुर्दैवाने आनंदीबाईंच्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होउ शकला नाही. 
मात्र चूल आणि मूल  म्हणजेच आयुष्य असे समजणाऱ्या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श आणि मानदंड घालून दिला. जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही हे या जोडप्याने सिद्ध करून दाखविले असे म्हणता येऊ शकेल.
              स्वतः डॉक्टर होऊनही कुणा देशभागिनिवर उपचार करण्याची संधी आनंदीबाईंना मिळालीच नाही.

लोकप्रिय संस्कृतीतील चित्राणे: आनंदीबाई यांच्या जीवनाचा आढावा घेणारा “आनंदी गोपाळ ” हा मराठी चित्रपट फेब्रुवारी २०१९ मधे प्रदर्शित झाला दिग्दर्शक समीर विद्वांस या चित्रपटाला पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्यसरकार यांच्यातर्फे जानेवारी २०२० मधे आयोजित केलेल्या १८ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मराठी विभागात पहिला पुरस्कार मिळाला आहे.
              आनंदीबाई जोशी यांच्या संघर्षगाथेवर अंजली कीर्तन यांनी एक डॉक्यूड्रामा तयार केला आहे. या लघुपटाला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

धन्यवाद....

लेखिका 
निकिता आढाव 
First Year
Interior Design
Envisage Institute Of Design












कोई टिप्पणी नहीं:

  how to choose right fashion designing Institute? When selecting a   fashion design institute  in India, particularly in Mumbai, it’s cruci...