सावित्रीबाई फुले (पहिली भारतीय महिला शिक्षिका )Best Fashion and Interior Design Institute in Borivali (west), “Envisage Institute of Design”

                                                              सावित्रीबाई फुले 

                                                        (पहिली भारतीय महिला शिक्षिका )
                                                                                 
                                                                                 



सावित्रीबाई फुले या भारतीय शिक्षिका, कवयत्रीसमाजसुधारक होत्या. त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात  त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ साली नायगाव येथे झाला. इसवी सन १८४० साली ज्योतिराव फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय ९ तर ज्योतिराव १३ वर्षांचे होते. ज्योतिरावांच्या घरी फुलांचा व्यवसाय असल्यामुळे त्यांचे आडनाव फुले असे होते. ज्योतिराव फुलेंनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकविले १ मे १८४७ रोजी सावित्रीबाईंनी मागासांच्या वस्तीत एक शाळा सुरु केली. हि त्यांची पहिली शाळा. १ जानेवारी १८४८ राजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. केवळ ४ वर्षात १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास "स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक" सोसायटी ने "कमलाबाई हाईस्कूल"  नावाची मुलींसाठी शाळा सुरु केली. ती शाळा आजही सुरु आहे.
             सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला ६ मुली होत्या. पण १८४८ साल संपेपर्यंत हि संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत  सनातनी उच्चं वर्णियांनी "धर्म बुडाला ", "जग बुडणार", "कली आला".... असे सांगून केले. सनातनी लोकांनी  विरोध केला. अंगावर शेण फेकले, काही उन्मतांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आला घातला. बालविवाह प्रथेमुळे अनेक मुली वयाच्या १२व्या १३व्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्णण समाजाला विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा स्रियांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला  येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.
            ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु केले सावित्रीबाईंनी ते समर्थपूर्वक चालवले. फसलेल्या व बलात्काराने गरोदर राहिलेल्या महिलांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत, याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.
            केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे, अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली, सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे . महात्मा फुले यांच्या निधनानंतर ( इ. स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली .
            सावित्रीबाईंनी ज्योतीबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला , स्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळावा हेही त्यांचे कार्यक्षेत्र होते. सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६-७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९० मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले आणि दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगसारख्या  भीषण रोगाच्या बळी ठरल्या. १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले. 

         सत्कार: 
                    पुणे येथील  शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये "ईस्ट इंडिया कंपनी" सरकारने फुले पती-पत्नीचा "मेजर कँडी" यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही दिले. त्यानंतरही सावित्रीबाई फुलेंनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी "गृहिणी" नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत. सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून  १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस हा "बालिकादिवस " म्हणून साजरा केला जातो.

धन्यवाद....

लेखक 
पल्लवी धानवे 
First Year 
Fashion design Department
ENVISAGE INSTITUTE OF DESIGN



कोई टिप्पणी नहीं:

  how to choose right fashion designing Institute? When selecting a   fashion design institute  in India, particularly in Mumbai, it’s cruci...