कल्पना चावला ( भारताची पहिली महिला अंतराळवीर ) Best Fashion and Interior Design Institute in Borivali (west), “Envisage Institute of Design”

                                                          कल्पना चावला
                                              ( भारताची पहिली महिला अंतराळवीर ) 
             

कल्पना चावला भारतीय-अमेरिकन अंतराळवीर आणि अंतराळ शटल मिशन तज्ज्ञ होती, आणि अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला.
               त्यांचा जन्म १ जुलै १९६२ रोजी कर्नाल, हरियाणा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री बनारसीलाल चावला आणि आईचे नाव संज्योतीदेवी. कल्पना चावला यांचा आरंभिक अभ्यास " टागोर बाळ निकेतन " मध्ये झाला. १९८२ मध्ये त्यांनी पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालय, चंदिगढ येथून एरोनॉटिकल अभियांत्रिकीच्या पुढील अभ्यासातून अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. १९८४ मध्ये अरलिंग्टन येथील टेक्साक्स विद्यापीठातूएरोनॉटिकल अभियांत्रिकीमध्ये तिने मास्टर ऑफ सायन्सची पदवी प्राप्त केली. आणि १९८८ मध्ये कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठ मधून एरोनॉटिकल अभियांत्रिकीमध्ये त्यांना विद्या वाचस्पती हि पदवी मिळाली. त्यांना विमान ग्लायडर्स आणि व्यावसायिक विमान परवान्यांचे प्रमाणित उड्डाण प्रशिक्षण होते त्यांना एकल आणि मल्टिइंजिन विमानासाठी व्यावसायिक ऑपरेटर म्हणून देखील परवाना मिळाला होता. अंतराळवीर होण्यापूर्वी ती नासाची एक प्रसिद्ध वैज्ञानिक होती.
              शैक्षणिक काळात कल्पना यांची जीन पियरे टेरिसन (जे. पी.) या युवकाशी ओळख झाली. जे. पी. यांचा विमानाचे प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय होता. १९८४ साली जे. पी. व कल्पना यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांना विमान नीट उडवण्यास येऊ लागले.
              डिसेंबर १९९४ मध्ये कल्पना ची निवड नसांमध्ये अंतराळवीर म्हणून झाली. अंतराळवीरांच्या १५व्य गटात तिने स्थान मिळविले. एक वर्षाचा प्रशिक्षणानंतर आणि परीक्षेनंतर चावला तांत्रिक बाबींवर काम करणाऱ्या ऍस्ट्रोनॉट ऑकिस एवा ( EVA एक्सट्रॅवेहिकलर ऍक्टिव्हिटी ) रोबोटिक्स अँड कॉम्पुटर ब्रांच या कार्यालयात रुजू झाली. तिच्या कामात रोबोटिक्स उपकरणांचा विकास आणि अंतराळ यानाला नियंत्रित करणाऱ्या सॉफ्टवेअरची शटल एव्हिओनिकस या प्रयोगशाळेत चाचणी घेणे समाविष्ट होते. १९९६ साली त्यांची निवड SIS-87 अवकाश यानावर मोहीम विशेषज्ञ आणि प्रमुख रोबोटिक हस्ताचालक म्हणून करण्यात आली.
कल्पनाने आपले पहिले अंतराळ उड्डाण SIS-87 कोलंबिया या अवकाश यानामधून १९ नोवेम्बर ते ५ डिसेंबर १९९७ एवढ्या कालावधीकरिता केले. या मोहिमेत अंतराळामध्ये भारहीनता कोणत्या प्रकारे भौतिक क्रियांमध्ये प्रभावित करते याविषयीच्या तसेच सूर्याच्या बाह्य वातावरणीय प्रतलांचे  निरीक्षण यावर भर दिलेला होता. सदस्यांपैकी दोन जणांनी एवाची कृती केलेली होती त्यात चावलांचा समावेश होता. हि मोहीम अवकाशात ३७६ तास आणि ३४ मिनिटे राहिली तर अवकाशयानाने पृथ्वीभोवती २५२ वेळा परिभ्रमण केले.
                कल्पना चावलांचे दुसरे व अंतिम उड्डाण १६ जानेवारी ते १ फेब्रुवारी २००३ या १६ दिवसांच्या कालावधीमधले हि मोहीम विज्ञान आणि संशोधनाला समर्पित होती. विविध वेळेत काम करून मोहिमेतले सदस्य दिवसातले २४ तास काम करत होते व त्यांनी त्यात जवळजवळ ८० यशस्वी प्रशिक्षणे केली मात्र या मोहिमेचा अंत दुःखद झाला. १ फेब्रुवारी २००३ ला कोलंबिया अवकाशयान परतीच्या मार्गावर असताना जमिनीवर उतरण्याच्या १६ मिनिटे आधी अवकाशयानात बिघाड झाल्यामुळे पेटले व दुर्घटनाग्रस्त झाले त्यात कल्पनांसहित अंतराळवीरांचा मृत्यू झाला. कल्पना चावला दोन्ही मोहिमांत एकूण ३० दिवस १४ तास व ५४ मिनिटे अंतराळात होती.
               कल्पना चावला ह्यांना मरणोत्तर कॉग्रेशनल स्पेस मेडल ऑफ ओनर, द नासा स्पेस फ्लाईट मेडल, आणि नासा  डिस्टिंग्विशड सर्विस मेडल या पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले. हरियाणा शासनाने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कुरुक्षेत्र येथे कल्पना चावला स्मारक तारामंडळ उभारले आहे.

धन्यवाद..... 
लेखक 
निकिता ठाकूर 
First Year 
Fashion Design Department
Envisage Institute Of Design


कोई टिप्पणी नहीं:

  how to choose right fashion designing Institute? When selecting a   fashion design institute  in India, particularly in Mumbai, it’s cruci...